पुणे: आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या 58 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपरजायंट्सचा 62 धावांनी पराभव ( Gujarat Titans Beat Lucknow Super Giants ) केला. यासह गुजरात टायटन्स हा आयपीएलच्या पंधराव्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या ( Captain Hardik Pandya ) म्हणाला की, मला आमच्या संघाचा अभिमान आहे. त्याचबरोबर त्याने एक मोठे वक्तव्य केले.
पुण्यातील एमसीए स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 144/4 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपरजायंट्सचा संघ 13.5 षटकांत सर्वबाद 82 धावांवर आटोपला. त्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, त्याचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल यावर नेहमीच विश्वास होता. परंतु दोन सामने शिल्लक असताना प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल हे वाटले नव्हते. त्यामुळे ही एक मोठी उपलब्धी आहे.
सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला ( Hardik Pandya said after the match ), 'खेळाडूंचा अभिमान आहे. जेव्हा आम्ही हा प्रवास एकत्र सुरू केला, तेव्हा आमचा स्वतःवर विश्वास होता. पण 14व्या सामन्यापूर्वी आम्ही पात्र ठरलो. हा एक चांगला प्रयत्न आहे आणि आम्हाला स्वतःचा अभिमान आहे. गेल्या सामन्यात, मी जाण्यापूर्वी मुलांशी खेळाडू सोबत बोललो होतो. सामना संपण्यापूर्वी मला वाटले, तो कधी संपला हे मला माहीत आहे.