मुंबई:पाचवेळचे चॅम्पियन मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) आणि चार वेळचे विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात जेव्हा जेव्हा आयपीएल सामना होतो, तेव्हा चाहत्यांना आणि क्रिकेटप्रेमींमध्ये तो उत्साहाने भरलेला असतो. आयपीएलमध्ये गुरुवारी मुंबई आणि चेन्नई यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग ( Former India offspinner Harbhajan Singh ), जो आयपीएलमधील दोन्ही संघांचा भाग होता, त्याला वाटते की एमआय विरुद्ध सीएसके ( MI vs CSK ) सामना भारत-पाकिस्तान सामन्याची अनुभूती देतो. कारण या सामन्या दरम्यान भावना उच्च पातळीवर असतात.
इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामात या दोन सर्वात यशस्वी संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा ( Chennai Super Kings ) संघ सहा सामन्यातील फक्त एका सामन्यात विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी चेन्नई संघापेक्षा खराब राहिली आहे. कारण मुंबई संघला आपल्या सहा सामन्यापैकी एका ही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत सर्वात तळाशी आहे.