मुंबई : रंगांचा सण होळी आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. लोक त्यांच्या मित्रपरिवारासह होळी खेळत आहेत. टीम इंडियाचे खेळाडू सध्या मुंबईत आयपीएलची तयारी करत आहेत, मात्र तेही होळी साजरी करत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सर्व चाहत्यांना आणि संपूर्ण देश वासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या ( Happy Holi from Rohit Sharma ) आहेत. मुंबई इंडियन्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
ज्यामध्ये रोहित शर्मा होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ बनवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी रितिका देखील आहे. जी रोहित शर्माच्या बाजूला उभा आहे. तसेच रोहित शर्मा चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत आहे पण कर्णधार पूर्णपणे गोंधळलेला दिसत आहे. यामुळेच रोहित शर्माने या शुभेच्छाचा व्हिडिओवर तयार करताना अनेक रिटेक घ्यावे लागत असल्याने रोहित शर्मा वैतागलेला दिसत आहे. ज्यामध्ये तो एडिटरकडून एडिट करुन घ्या असे सांगत आहे. तसेच तो वैतागून डिरेक्टर आणि कॅमेरामॅन कोण आहे, असे विचारताना देखील दिसत आहे. शेवटी-शेवटी होळीच्या शुभेच्छाचा डायलॉग तुम्ही एडिट करुन त्यात अॅड करा, असे म्हणत आहे.