मुंबई - यॉर्कर किंग अशी ओळख असलेला श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ मलिंगा याने मागील आठवड्यात क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. 2019 च्या अंतिम सामन्यात मलिंगाने अखेरच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सला विजेतेपद जिंकून दिले होते. आजपासून आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला यूएईत सुरूवात होणार आहे. त्याआधी मलिंगाने मुंबई इंडियन्स संघात खेळण्याचा अनुभव शेअर केला आहे.
लसिथ मलिंगाने मुंबई इंडियन्सच्या अधिकृत वेबसाईटच्या हवाल्याने सांगितलं की, जेव्हा मी मुंबई इंडियन्स संघात खेळलो. तेव्हा मला भारतासह जगभारतील अनेक चाहते मिळाले. सर्व युवा क्रिकेटपटूंचे स्वप्न असते की, खासकरून आयपीएल आणि नॅशनल संघात खेळण्याची संधी मिळायला हवी. मला ती मिळाली. यामुळे मी मुंबई इंडियन्ससोबतचा अनुभव शेअर करू इच्छित आहे. मुंबईकडे एक चांगला सहयोगी स्टाफ आहे. यामुळे मी आयपीएलमध्ये माझी निवड कशी झाली हे रोचक आहे.
2008 मध्ये मला लिलावात सहभागी करण्यात आलं. मला माझ्या मॅनेंजरचा फोन आला, त्याने सांगितलं की, मला त्या वर्षी मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळत आहे. त्याने मला मुंबईत श्रीलंका संघाचे आणखी दोन खेळाडू असल्याचे सांगितलं. तसेच त्याने सांगितलं की, या संघाचे मालक मुकेश अंबानी आणि त्याची पत्नी नीता अंबानी या आहेत. पण 2008 चा हंगाम माझ्यासाठी दुर्दैवी ठरला. माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. यामुळे मी आयपीएल खेळाडू शकलो नाही. पण मी त्यानंतर मुंबईकडून खेळलो. माझा मुंबई इंडियन्स संघात खेळण्याचा अनुभव चांगला होता, असे देखील मलिंगाने सांगितलं.