बंगळुरु :क्रिकेटपटू विराट कोहलीच्या ( Cricketer Virat Kohli ) चार चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारसोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचे उल्लंघन केल्याबद्दल बेंगळुरूमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी सोमवारी माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या विरोधात कब्बन पार्क पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी एकाला कलबुर्गी आणि दुसऱ्याला बेंगळुरू येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या विराटच्या चाहत्यावंर सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवस-रात्र कसोटीच्या ( Day-night Test match ) दुसऱ्या दिवशी (रविवारी) रात्री सव्वा दहा वाजता, विराट कोहली सोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानात शिरकाव केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या उत्साहाने अडचणीत आणले आहे.