मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श ( All-rounder Mitchell Marsh ) किमान 10 दिवस संघाबाहेर राहणार आहे. कारण दिवसभरात झपाट्याने बदलणाऱ्या घडामोडीत त्यांची कोविड-19 साठीची दुसरी आरटी-पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्याशिवाय, दिल्लीच्या सपोर्ट स्टाफच्या दोन सदस्यांची देखील चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, ज्यामुळे संघातील संक्रमित सदस्यांची संख्या चार झाली आहे. याबाबतची माहिती दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर ट्विट करुन देण्यात आली आहे.
मार्शला रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Mitchell Marsh hospitalized ) आहे. इतर दोन जण पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये टीम डॉक्टर अभिजित साळवी आणि टीम मसाजरचा समावेश आहे. इतर सर्व खेळाडूंचा RT-PCR अहवाल निगेटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी टीम फिजिओ पॅट्रिक फरहार्ट ( Team Physio Patrick Farhart ) यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यानंतर ते आयसोलेशनमध्ये आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने सोमवारी पीटीआयला सांगितले की, मिशेल मार्शचा पहिला आरटी-पीसीआर अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र त्यांचा दुसरा आरटी-पीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्याशिवाय इतर सर्व खेळाडूंच्या आरटी-पीसीआर चाचणीचा निकाल निगेटिव्ह आले आहेत. बुधवारी होणाऱ्या दिल्ली आणि पंजाब किंग्ज ( Punjab Kings ) यांच्यातील आयपीएल सामन्याला कोणताही धोका नाही.
असे समजले आहे की, मार्शला या आजाराची लक्षणे दिसून आली होती आणि त्याची जलद प्रतिजन चाचणी करण्यात आली होती, जी पॉझिटिव्ह आली होती. हे देखील असू शकते, कारण त्याचे फरहार्टच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन चालू होते आणि त्याला सौम्य लक्षणे होती जी धोकादायक ठरली नाहीत. साळवी यांचे फरहार्ट आणि मार्श यांच्याशीही जवळचे संबंध होते. यापूर्वी, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले होते की, दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals Team ) सोमवारी पुण्याला जाणार होते. मात्र संघातील सर्व सदस्यांना आपापल्या खोलीत राहण्यास सांगण्यात आले आहे. कारण टीममध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव आहे की नाही हे शोधण्यासाठी आरटी-पीसीआर करण्यात आले होते.
संघातील इतर सदस्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे बुधवारी पंजाब विरुद्धचा सामना खेळवला जाण्याची शक्याता आहे. सर्व संघ पुण्यातील कोनराड हॉटेलमध्ये थांबले आहेत, अशी माहिती सूत्राने दिली. जिथे बीसीसीआयने बायो-बबल बनवला आहे. दिल्ली कॅपिटल्सने प्रवास करायचा होता, पण आता उशीर झाला आहे. तपासात ज्यांचे निकाल नकारात्मक येणार आहेत ते उद्या पुढील प्रवासाला निघणार हे उघड आहे.
बीसीसीआयच्या कोरोना चाचणी प्रोटोकॉलनुसार ( BCCI Corona Testing Protocol ), आयपीएल संघातील प्रत्येक टीम सदस्याची बायो- बबलमध्ये दर पाचव्या दिवशी चाचणी केली जाते. शेवटच्या सत्रात ते दर तिसऱ्या दिवशी असायचे. याशिवाय, फ्रँचायझी आपल्या सदस्यांना हवे असल्यास त्यांची चाचणी देखील घेऊ शकते. दिल्ली संघातील एका सूत्राने सकाळी सांगितले की, "आम्ही आज येथून निघणार होतो, परंतु पुढील सूचना मिळेपर्यंत खोलीत राहण्यास सांगितले आहे."
हेही वाचा -फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कोसळला दु:खाचा डोंगर, नवजात मुलाचे निधन