महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोनाग्रस्त आई-वडिलांच्या उपचारासाठी क्रिकेटरकडे नव्हते पैसे; ज्वालाने केली मदत - सरावंती नायडूच्या आईवडिलांना कोरोना लागण

भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा माजी क्रिकेटर सरावंती नायडूच्या मदतीसाठी धावली आहे. तिने सरावंतीला आर्थिक मदत दिली आहे. तसेच तिने तेलंगणा सरकारकडे मदत मागितली आहे.

former-team-india-player-parents-fighting-with-corona-jwala-gutta-asked-for-help
कोरोनाग्रस्त आई-वडिलांच्या उपचारासाठी क्रिकेटरकडे नव्हते पैसे; ज्वालाने केली मदत

By

Published : May 17, 2021, 6:58 PM IST

हैदराबाद - भारताची माजी महिला क्रिकेट सरावंती नायडू हिच्या आई वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान, भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा सरावंतीच्या मदतीसाठी धावली आहे. तिने सरावंतीला आर्थिक मदत दिली आहे. तसेच तिने तेलंगणा सरकारकडे या संदर्भात मदत मागितली आहे.

ज्वाला गुट्टाने या संदर्भात ट्विट केले आहे. भारताची आणि हैदराबादची माजी अष्टपैलू सरावंती नायडूच्या आई-वडिलांचा कोरोनाशी संघर्ष सुरू आहे. तिने आत्तापर्यंत १६ लाख रुपये खर्च केला आहे. आणखी खर्चासाठी तिला मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही मदत करा, आशयाचे ट्विट ज्वालाने केले आहे. या ट्विटमध्ये तिने टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटीआर यांनाही टॅग केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती हिने कोरोनामुळे आई आणि बहिणीला गमावलं आहे. पण बीसीसीआयने वेदाची साधी चौकशीही केली नाही, असा आरोप ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने केला आहे.

हेही वाचा -वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा

हेही वाचा -'नॅशनल क्रश' रश्मिकाला आवडतो 'हा' क्रिकेटपटू

ABOUT THE AUTHOR

...view details