कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि प्रसिद्ध समालोचक रमीज राजा अधिकृतपणेसोमवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आज शनिवारी याची घोषणा केली. गव्हर्नर बोर्डाच्या विशेष बैठक सोमवारी बोलवण्यात आली आहे. यात पीसीबी निवडणूक आयुक्त न्यायाधीश (निवृत्त) शेख अजमत सईद निवडणूक प्रक्रिया पूर्ण करतील. ते या बैठकीचे अध्यक्ष असणार आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी रमीज राजा आणि वरिष्ठ ब्यूरोक्रेट असद अली यांची गव्हर्नर बोर्डाचे नवे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. इमरान खान हे पीसीबीचे मुख्य संरक्षक आहेत. एहसान मनी यांच्या जागेवर पीसीबीचे अध्यक्ष म्हणून रमीज राजा यांची नियुक्ती निश्चित आहे. मनी यांचा कार्यकाळ मागील महिन्यात संपला आहे. पीसीबीने सांगितंल की, बैठकीनंतर नवे अध्यक्ष पत्रकारांशी संवाद साधतील.
रमीज राजा यांची कारकिर्द