महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

नेपाळ संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछानेला बलात्कार प्रकरणी अटक - संदीप लामिछाला बलात्कार प्रकरणी अटक

नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. त्याला आज काठमांडूत विमानतळावर अटक केली.

लामिछाला बलात्कार प्रकरणी अटक
लामिछाला बलात्कार प्रकरणी अटक

By

Published : Oct 6, 2022, 11:44 AM IST

Updated : Oct 6, 2022, 3:54 PM IST

काठामांडू -नेपाळ संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. त्याला आज काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले.

नेपाळच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यासाठी मी सकाळी 10:00 वाजता कतार एअरवेजने काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत आहे असे लामिछानेने गुरुवारी सकाळी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. लामिछानेने कोणत्याही चुकीच्या कृत्याचा इन्कार केला आहे. मला खात्री आहे की मला न्याय मिळेल आणि माझ्या प्रिय देशाचे नाव आणि कीर्ती राखण्यासाठी लवकरच क्रिकेटच्या मैदानावर परतेन असे त्याने म्हटले आहे. मी लवकरात लवकर खटला चालवावा यासाठी प्रार्थना करतो आहे. मी तपासाच्या सर्व टप्प्यात पूर्ण सहकार्य करीन आणि माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कायदेशीर लढाई लढेन, शेवटी न्यायाचा विजय होऊ द्या, असेही त्याने म्हटले आहे.

लामिछाने वर एका 17 वर्षीय मुलीने आरोप केला आहे की त्याने तिला 21 ऑगस्ट रोजी काठमांडू आणि भक्तपूर येथील विविध ठिकाणी नेले आणि नंतर काठमांडूच्या सिनामंगल येथील एका हॉटेलमध्ये नेवून त्याच रात्री तिच्यावर बलात्कार केला. इंटरपोल (इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन) कडून आधीच एक डिफ्यूजन नोटीस जारी करण्यात आली आहे, कारण त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. काठमांडू जिल्हा न्यायालयाने त्याच्याविरुद्ध बलात्काराच्या प्रकरणात अटक वॉरंट जारी केले आहे. अटक वॉरंट जारी केल्यानंतर, पोलिसांनी लामिछाने जेथे दिसला तेथे त्याला अटक करण्यासाठी आधीच आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवले आहे. गुरुवारी त्याच्या आगमनानंतर, त्याला इमिग्रेशन डेस्कद्वारे ताब्यात घेतले जाईल आणि पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल. तेथून त्याला जिल्हा पोलीस रेंज काठमांडू येथे नेण्यात येईल.

आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. तो आल्यावरच पुढील तपास केला जाईल, असे काठमांडू जिल्हा पोलीस परिक्षेत्र येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक भरत बहादूर बोहरा यांनी ANI ला सांगितले. लामिछानेच्या औपचारिक अटकेच्या 25 दिवसांच्या आत जिल्हा वकिलांच्या मार्फत न्यायालयात खटला दाखल करणे आवश्यक आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करतील आणि नंतर त्याचा अहवाल वकील कार्यालयास सादर करतील. अहवालातील तक्रारीत नमूद केलेल्या घटना आणि पोलिस तपास जुळल्यानंतर कोर्टात औपचारिक केस नोंदविली जाईल. या खटल्याच्या सुनावणीत लामिछाने यांना न्यायालयीन तारखेला जामीन द्यायचा की कोठडीत ठेवायचे याचा निर्णय होईल. न्यायिक मंडळाकडून ही पहिली सुनावणी होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.

गेल्या वर्षी लेगस्पिनर लामिछानेची नेपाळ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याने यापूर्वी 2016 मध्ये आशिया चषक आणि नंतर 2017 मध्ये आशियाई क्रिकेट परिषद विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी नेपाळ अंडर-19 संघाचे नेतृत्व केले होते.

Last Updated : Oct 6, 2022, 3:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details