मुंबई -इंग्लंडच्या साउथम्पटनमध्ये पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या डावात भारतीय संघाने आणखी काही धावा केल्या असत्या तर, कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळा लागू शकला असता, असे मत अनेक माजी खेळाडूंनी मांडलं आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या सामन्यात बेजाबदार फटका मारताना बाद झाला. यावरुन भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने पंतवर टीका केली आहे.
इरफान पठाण एका क्रीडा माध्यमासाठी समालोचन करतो. अंतिम सामन्यात पंत ज्या पद्धतीने बेजबाबदार फटका मारून बाद झाला ते पाहून इरफान निराश झाला. याविषयावर बोलताना पठाण म्हणाला, 'आक्रमकता आणि मूर्खपणा यात थोडा फरक आहे. जलद गोलंदाजाविरुद्ध पुढे येऊन षटकार मारणे, आक्रमकता नव्हे तर मूर्खपणा आहे.'
हेही वाचा -'WTC च्या विजयाने २०१९ विश्वकरंडक फायनलमधील पराभवाचं नुकसान भरून निघालं'