महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Mithali Raj Announced Retirement : भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा - कोण मिताली राज

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने आज एक मोठी घोषणा केली आहे. मिताली राजने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर ( Mithali retire all forms of international cricket ) केली आहे. याबाबतची माहिती स्वत: मिताली राजने आपल्या सोशल मीडियाच्या हॅन्डलवरुन दिली आहे.

Mithali Raj
Mithali Raj

By

Published : Jun 8, 2022, 2:48 PM IST

Updated : Jun 8, 2022, 3:21 PM IST

हैदराबाद: भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राजने ( Former India captain Mithali Raj ) आज एक मोठी घोषणा केली आहे. मिताली राजने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर ( Mithali Raj announced retirement international cricket ) केली आहे. याबाबतची माहिती स्वत: मिताली राजने आपल्या सोशल मीडियाच्या हॅन्डलवरुन दिली आहे.

भारतीय महिला क्रिकेटचा कणा मानल्या जाणाऱ्या मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मितालीने 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गेल्या 23 वर्षांपासून मिताली राज इंटरनॅशनल क्रिकेट खेळत होती. परंतु मिताली राजने वयाच्या 39 वर्षी आपला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास थांबवला आहे. बुधवारी तिने आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन ट्विट करत याबाबत माहिती दिली.

भारतीय क्रिकेटर मितली राजने ( Indian cricketer Mitali Raj ) ट्विट करताना लिहले,'' लहानपणी, मी निळी जर्सी घालण्याचे स्वप्न पाहिले होते. कारण माझ्या देशासाठी खेळणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. माझा प्रवास अनेक यशांनी आणि काही अपयशांनी भरलेला आहे. गेली 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान आहेत. प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही थांबवायचा होता. आज तो दिवस आहे, जेव्हा मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. प्रत्येक वेळी मी मैदानात उतरले, तेव्हा मी भारताला सामने जिंकण्यासाठी माझे 100 टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताकडून खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी नेहमीच आभारी राहीन.''

मितालीने यापूर्वीच 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली ( Mithali retires from T20 cricket ) होती. त्यानंतर आता तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेतली आहे. ती अखेरचे यावर्षी न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला विश्वचषकात खेळताना दिसली होती.

वनडेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे मिताली -

मितालीची एकदिवसीय कारकीर्द आश्चर्यकारक होती आणि ती महिला वनडेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिने भारताकडून खेळलेल्या 232 एकदिवसीय सामन्यांच्या 211 डावांमध्ये 7805 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. महिला क्रिकेटमध्ये 6000 किंवा त्याहून अधिक धावा करणारी मिताली ही एकमेव महिला फलंदाज आहे. मितालीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 64 अर्धशतके झळकावली आहेत आणि महिला वनडेमध्ये 50 किंवा त्याहून अधिक अर्धशतके झळकावणारी ती एकमेव फलंदाज आहे. तिने 89 टी-20 सामन्यांमध्ये 17 अर्धशतकांसह 2364 धावा आणि 12 कसोटी सामन्यांमध्ये 699 धावा केल्या आहेत.

कर्णधार म्हणून विक्रम -

1. मिताली राज (भारत) - एकूण 155 सामने, 89 विजय, 63 पराभव

2. सी. एडवर्ड्स (इंग्लंड) - एकूण सामने 117, 72 विजय, 38 पराभव

3. बी. क्लार्क (ऑस्ट्रेलिया) - एकूण सामने 101, 83 विजय, 17 पराभव

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडू-

1. मिताली राज (भारत) - 232 सामने, 7805 धावा, 50.68 सरासरी

2. सी. एडवर्ड्स (इंग्लंड) - 191 सामने, 5992 धावा, 38.16 सरासरी

3. सारा टेलर (वेस्ट इंडिज) - 145 सामने, 5298 धावा, 44.15 सरासरी

हेही वाचा -Para Shooting World Cup : अवनी लेखराने नवीन विश्वविक्रमासह जिंकले सुवर्णपदक

Last Updated : Jun 8, 2022, 3:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details