नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना याच्या वडीलांचे निधन (Suresh Raina father Passed Away) झाले आहे. सुरेश रैनाचे वडील त्रिलोकचंद रैना यांचे दीर्घ आजाराने निधन ( Trilokchand Raina death due to cancer) झाले. एका सूत्राने पीटीआयशी बोलताना सांगितले की, ते मागील एक वर्षापासून कँसरशी झुंज देत होते. परंतु आज त्यांची झुंज अपयंशी ठरली आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
सुरेश रैनाचे वडील त्रिलोकचंद रैना यांच्या निधनानंतर बऱ्याच आजी-माजी खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे. तसेच भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने देखील शोक व्यक्त करताना श्रद्धांजली अर्पण केली आहे.