हैदराबाद: शनिवारी (23 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील डबल हेडर सामने खेळवले गेले. यामधील दुसरा सामना म्हणजेच 36वा सामना सनराइजर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad ) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) संघात खेळला गेला. या सामन्यात सनराइजर्स हैदराबाद संघाने आरसीबी संघावर 9 विकेट्सने मात करत, सलग पाचवा विजय नोंदवला. सनराइजर्स हैदराबादच्या टी नटराजनने ( Bowler T Natarajan ) आपल्या डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. यावर आता न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराने एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( SRH vs RCB ) संघात झालेल्या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 16.1 षटकांत सर्वबाद 68 धावा केल्या होत्या. त्यामुळे हैदराबाद संघाला 69 धावांचे लक्ष्य मिळाले होते. याला प्रत्त्युत्तर देताना सनराइजर्स हैदराबाद संघाने 8 षटकांत 1 गडी गमावत 71 धावा करून विजय संपादन केला.
न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी ( Former spinner Daniel Vettori ) याने वेगवान गोलंदाज टी नटराजनच्या भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या संभाव्यतेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. व्हिटोरीच्या म्हणण्यानुसार, टी नटराजनच्या आयपीएल 2022 मधील जबरदस्त कामगिरीनंतर संघात सामील होण्याची शक्यता वाढली आहे. टी नटराजनबद्दल बोलायचे तर आयपीएल 2022 मधील त्याची कामगिरी चांगली राहिली नाही. त्याने आतापर्यंत सात सामन्यांत 14.53 च्या सरासरीने 15 बळी घेतले आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 8.07 राहिला आहे.