महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC ODI Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानी विराजमान - sports news

भारत आणि इंग्लंड ( IND VS ENG ) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना रविवारी ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे खेळला गेला. आठ वर्षांनंतर भारताने इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत पराभूत केले. त्याचबरोबर आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत आपले तिसरे स्थान भक्कम ( India consolidate No. 3 position ) केले.

IND
भारत

By

Published : Jul 18, 2022, 1:43 PM IST

मँचेस्टर : इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर भारताने ( India won ODI series against England ) आयसीसी क्रमवारीत पुन्हा तिसरे स्थान पटकावले आहे. भारताच्या इंग्लंडवर मालिका विजयामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय संघ क्रमवारीत पाकिस्तानच्या पुढे तिसरे स्थान मजबूत केले ( India 3rd position ICC ODI rankings ) आहे. 109 रेटिंग गुणांसह भारत आता पाकिस्तानपेक्षा (106) तीन गुणांनी पुढे आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड 128 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.

तीन सामन्यांची वनडे मालिका ( IND VS ENG ODI Series ) जरी भारतीय संघाने जिंकली असले, तरी जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ 121 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर ( England 121 rating points ranked second ) आहे. तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतकामुळे भारताला इंग्लंडविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकण्यात मदत झाली. तसेत हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी देखील भारतीय संघासाठी महत्वाची ठरली.

या मालिकेतील विजयासह भारतीय संघाने तिसरे स्थान मिळवले. येत्या आठवड्यात ते बदलू शकते, सहाव्या स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेपेक्षा सध्या फक्त सात रेटिंग पॉइंट्स पाकिस्तानने मागे आहेत. त्यांनी इंग्लंडविरुद्धची आगामी तीन सामन्यांची मालिका जिंकल्यास ते चौथ्या स्थानावर जाऊ शकतात.

भारत महिन्याच्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. पाकिस्तान सध्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. त्यानंतर ऑगस्टमध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात संघ नेदरलँड्सविरुद्ध खेळेल.

हेही वाचा -Vedaant Madhavan New Record : वेदांत माधवनने 1500 मीटर फ्रीस्टाइलमध्ये मीटचा रचला नवा विक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details