महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Shreyas Iyer Ruled Out of ODI Series : 'या' कारणामुळे श्रेयस अय्यर वनडे मालिकेतून बाहेर - श्रेयस अय्यर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय मालिका १७ मार्चपासून सुरू होत आहे. या मालिकेतून श्रेयस अय्यरला वगळण्यात आले आहे.

Shreyas Iyer Ruled Out of ODI Series
श्रेयस अय्यर वनडे मालिकेतून बाहेर

By

Published : Mar 16, 2023, 8:47 AM IST

नवी दिल्ली :टीम इंडिया शुक्रवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला वनडे सामना खेळणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर दुपारी दीड वाजता सुरू होईल. पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल. रोहित पहिला सामना खेळणार नाही. रोहित बाहेर पडल्यामुळे हार्दिक पांड्याकडे विजयाची जबाबदारी असेल. पण त्याला श्रेयस अय्यरची उणीव भासण्याची शक्यता आहे. अय्यर तीन सामन्यांच्या मालिकेतून बाहेर आहे.

दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले :त्याच्या जागी संघात कोणाची वर्णी लागणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. अहमदाबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी मैदानात आला नाही. पाठदुखीमुळे त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पाठवण्यात आले होते. फील्डिंग कोच टी दिलीप म्हणाले, श्रेयसला दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्याला पुनर्वसनासाठी एनसीएकडे पाठवण्यात आले आहे.

चौथी कसोटी अनिर्णित : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे आणि तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्च रोजी चेन्नई येथे होणार आहे. श्रेयस अय्यरला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चारपैकी एका कसोटी सामन्यातही खेळण्याची संधी मिळाली नाही. भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळली गेलेली चौथी कसोटी अनिर्णित राहिली. अखेरच्या कसोटीत विराट कोहलीने तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले.

केकेआरचा अय्यर कर्णधार :अय्यरच्या दुखापतीमुळे कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) देखील अडचणी येऊ शकतात. दोन वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या केकेआरचा अय्यर कर्णधार आहे. आयपीएल 2023 चा हंगाम 31 मार्चपासून सुरू होत आहे. केकेआरचा पहिला सामना पंजाब किंग्जविरुद्ध 1 एप्रिल रोजी मोहली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापर्यंत श्रेयस फिट होतो की नाही, हे पाहावे लागेल. त्याच्या अनुपस्थितीत केकेआरला नवा कर्णधार बनवावा लागेल.

हेही वाचा : IND vs AUS First One Day : टीम इंडियाचे कसोटीनंतर वनडे मालिकेकडे लागले लक्ष, रोहित-कोहली नोंदवणार 'हा' विक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details