महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

WTC Final : मोहम्मद शमीचा खास सराव; इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो - mohammad shami news

मोहम्मद शमीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो अपलोड केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याला त्याने, ओपन नेट प्रॅक्टिस, असे कॅप्शन दिले आहे. शमीने खुल्या मैदानात नेट सराव केला. त्याचा हा फोटो आहे. शमीने फोटो शेअर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

fast-bowler-mohammad-shami-shares-instagram-post-steaming-open-net-practice
WTC Final : मोहम्मद शमीचा खास सराव; इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो

By

Published : Jun 15, 2021, 8:59 PM IST

लंडन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरूवात होण्यासाठी अवघ्या तीन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी कस्सून तयारी करत आहेत. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने देखील सराव सत्रात घाम गाळला. शमीने या खास सरावाचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे.

मोहम्मद शमीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो अपलोड केला आहे. हा फोटो शेअर करताना त्याला त्याने, ओपन नेट प्रॅक्टिस, असे कॅप्शन दिले आहे. शमीने खुल्या मैदानात नेट सराव केला. त्याचा हा फोटो आहे. शमीने फोटो शेअर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याला साउथम्पटन येथे १८ जूनपासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघांनी या सामन्यासाठी आज आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. भारताच्या १५ सदस्यीय संघात मोहम्मद शमीचा देखील समावेश आहे. भारतीय संघ अंतिम सामन्यात ३ ते ४ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. ज्यात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचे नाव वरच्या क्रमांकावर आहे.

भारताचा १५ सदस्यीय संघ -

रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, वृद्घीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंडचा १५ सदस्यीय संघ -

केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवे, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग आणि विल यंग.

हेही वाचा -WTC Final : केएल राहुल, मयांक अगरवाल यांना विश्रांती तर या 15 शिलेदारांची निवड

हेही वाचा -पीसीबीकडून आमिरची मनधारणी? वसीम खान अनुभवी गोलंदाजाच्या घरी पोहोचले

ABOUT THE AUTHOR

...view details