मेहसाणा (गुजरात): भाड्याचे शेत... 400 रुपये मजूरी बनले खेळाडू.. सीएसके आणि एमआयची घातली जर्सी.. परदेशी सट्टेबाजीचा मोठा खेळ... गुजरातच्या वडनगर भागात ( Incidents in Vadnagar area of Gujarat ) असलेल्या एका गावात हेच खेळले जात आहे, जे ऐकून सगळेच हैराण आणि चकीत झाले आहेत. हे सर्व कसे घडले हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे, चला तर मग हा संपूर्ण खेळ पाहूया..
गुजरातमध्ये बनावट टी-20 क्रिकेट स्पर्धा ( Gujarat fake T20 cricket tournament ) आयोजित करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एवढेच नाही तर सामन्यांचे थेट प्रक्षेपण करून रशियाचे बुकी सट्टा लावत होते. पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, टोळीतील चार जणांना अटक करण्यात आली आहे.
मेहसाणाच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे (एसओजी) निरीक्षक भावेश राठोड म्हणाले, "इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सारख्या मोठ्या स्पर्धेची प्रतिमा तयार करण्यासाठी, मुख्य आरोपी शोएब दावडा याने भाड्याच्या शेतात क्रिकेटचे मैदान ( Cricket ground built on rented farm ) तयार केले. सुमारे 20 मजूर आणि स्थानिक बेरोजगार तरुणांची मदत घेतली. शोएबने या लोकांना मॅचमध्ये बनावट टीम जर्सी घालून खेळवले. कोलू मोहम्मद, सादिक दावडा आणि मोहम्मद साकिब अशी अन्य तीन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, साकिब व्यतिरिक्त इतर सर्वजण वडनगरमधील मोलीपूर गावचे रहिवासी आहेत.
बनावट क्रिकेट लीग चालवणाऱ्यांकडून ही सामग्री सापडली 7 जुलै रोजी, मेहसाणा एसओजी टीमने रशियन बुकींशी संबंधित क्रिकेट सट्टेबाजी रॅकेटची माहिती मिळाल्यानंतर मोलीपूर गावाच्या हद्दीत नव्याने बांधलेल्या क्रिकेट मैदानावर छापा टाकला. पोलिसांनी क्रिकेट किट, फ्लड लाईट, जनरेटर, सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी वापरलेला व्हिडीओ कॅमेरा, एलईडी टीव्ही, एक लॅपटॉप आणि रेडिओ वॉकीटॉकी जप्त केला असून, त्याची एकूण किंमत 3 लाख 21 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की प्राथमिक तपासातून समोर आले आहे की शोएबने येथे आयपीएल सारख्या स्पर्धा आयोजित करण्याचा आणि यूट्यूब चॅनेलवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण करून रशियन बुकींकडून सट्टा मिळविण्याची योजना आखली होती. शोएबने रशियात काम केले असून नुकताच तो मोलीपूर या गावी परतला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, "रशियामध्ये त्याच्या मुक्कामादरम्यान, त्याला (शोएब) असिफ मोहम्मदकडून क्रिकेट सट्टेबाजीबद्दल माहिती मिळाली, ज्याने त्याला अशा प्रकारच्या बनावट स्पर्धा आयोजित करण्याचा सल्ला दिला होता."
आरोपींकडून या वस्तू सापडल्या अधिका-याने सांगितले की ते खरे वाटावे यासाठी, त्यांनी अधिक चांगल्या थेट प्रक्षेपणासाठी या टोळीने फ्लडलाइट्स आणि व्हिडिओ कॅमेरे बसवले. क्रिकहीरोज मोबाइल अॅपवर सेंच्युरी हिटर्स 20-20 ( Century heaters 20-20 ) म्हणून स्पर्धेची नोंदणी केली आणि दोन आठवड्यांपूर्वी थेट प्रक्षेपण सुरू केले. स्पर्धेत चेन्नई फायटर्स, गांधीनगर चॅलेंजर्स आणि पालनपूर स्पोर्ट्स किंग्स अशी बनावट संघांची नावे देण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, शोएबने सुमारे 20 मजूर आणि स्थानिक तरुणांना टी-20 क्रिकेट सामने खेळण्यासाठी ठेवले होते, ज्यांना तो प्रत्येक सामन्यासाठी 400 रुपये देत असे.
राठोड म्हणाले की, यूट्यूब चॅनलवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण ( Live coverage on YouTube channel ) सुरू असताना रशियात बसलेल्या आसिफने बुकींकडूनन सट्टा लावला. तो अजूनही रशियात आहे. सामन्यादरम्यान, साकिब, मूळचा उत्तर प्रदेशचा, त्याने टेलिग्राम अॅपद्वारे आसिफच्या संपर्कात राहून मैदानी पंच म्हणून काम करणाऱ्या कोलू आणि सादिक यांना वॉकी-टॉकीवक सूचना देत असे. यानंतर पंच खेळाडूंना जाणीवपूर्वक संथ चेंडू टाकायच्या सूचना देत. तसेच फलंदाजांना देखील जाणूनबुजून आऊट होण्यास सांगायचे, यातून ही टोळीची सट्टेबाजीतून अधिक कमाई होत असे, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा -Venkatesh Prasad Statement : कुंबळे, गांगुली आणि युवराज यांना संघातून वगळले गेले... तर कोहलीला का नाही?