मुंबई - माजी क्रिकेटर लालचंद राजपूत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बातचित केली. यात त्यांनी सांगितलं की, क्रिकेट अफगाणिस्तानींना एकमेकांसोबत जोडतं. मला आशा आहे की, अफगाण क्रिकेटचा विकास चालू राहिलं. दरम्यान, राजपूत यांनी 2016 ते 2017 या काळात अफगाणिस्तान क्रिकेट संघाला प्रशिक्षण दिलं आहे.
लालचंद म्हणाले की, अफगाणिस्तानसाठी क्रिकेट नवीन आहे. 19व्या शतकाच्या सुरूवातीला इंग्रजांनी क्रिकेट खेळायला सुरूवात केली. पण अफगाणिस्तानला भारत आणि पाकिस्तान सारखं क्रिकेट क्षेत्रात जास्त पाय रोवता आलेले नाहीत. 1980 च्या दशकात सेवियत संघविरुद्धच्या युद्धात पळालेल्या अफगाणिस्तांनीनी पाकिस्तानमध्ये शरण घेतले. तिथे त्यांनी क्रिकेट खेळायला सुरूवात केली. राशिद खान टी-20 क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठमधील एक खेळाडू आहे. नबी पाकिस्तानमध्ये क्रिकेट शिकला. पण क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट तालिबानच्या शासनात आला.
अफगाणिस्तान क्रिकेट संघ ज्याला आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ओळखले जाते, याची स्थापना 1994 साली झाली. तालिबानींनी फुटबॉल आणि अॅथलिटवर बंदी घातली. तेव्हा क्रिकेट कसाबसा यातून वाचला. अनेक जण पाकिस्तानमध्ये क्रिकेट शिकले.