लंडन -भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यातील दुसऱ्या सामन्याला आजपासून लॉर्ड्सच्या मैदानावर सुरूवात झाली आहे. उभय संघातील या सामन्यात यजमान इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, उभय संघातील पहिला सामना पावसामुळे ड्रॉ झाला आहे.
नाणेफेक झाल्यानंतर बोलताना विराट म्हणाला, आम्ही नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजीच स्वीकारली असती. पण प्रथम फलंदाजी करणे वाईट नाही. यात चांगल्या धावा करण्याची संधी आहे. आम्ही या सामन्यासाठी एक बदल केला आहे. शार्दुलच्या जागेवर इशांत शर्मा या सामन्यात खेळेल. आम्ही आजच्या सामन्यासाठी 12 खेळाडूंची निवड केली ज्यात अश्विनचा समावेश आहे. पण संघाचे हित आमच्यासाठी महत्वाचं आहे. प्रत्येक खेळाडू आपलं योगदान देऊ इच्छितो. हे फलंदाजाविषयी आहे. फक्त आम्हाला आमचं लक्ष्य पूर्ण करायचे आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूट नाणेफेक जिंकल्यानंतर म्हणाला, आम्ही गोलंदाजीसोबत जाऊ. खेळपट्टीवर असलेलं गवत पाहता गोलंदाजी करणे उचित ठरेल. संघात तीन बदल आहेत. यात क्राउलीच्या जागेवर हमीद, ब्राँडच्या जागेवर वुड आणि लॉरेन्सच्या जागेवर अलीला संघात स्थान देण्यात येत आहेत. अली अनुभवी खेळाडू आहे. तो धावा आणि विकेट घेण्यात मदत करतो.
भारतीय संघ -