लीड्स :न्यूझीलंड संघाला 3-0 असा क्लीन स्वीप दिल्यानंतर आक्रमक क्रिकेट खेळणारा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने भारताविरुद्धच्या आगामी पाचव्या कसोटी सामन्यात आपल्या संघाचा उत्साह कमी होणार नाही, असे म्हटले आहे. भारताविरुद्धची एकमेव कसोटी ( India vs England Test Match ) ही गेल्या वर्षीच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील उरलेली आहे, जी पाहुण्या संघाच्या ताफ्यात कोविड-19 ची प्रकरणे आढळून आल्यामुळे रद्द करण्यात आली होती. शुक्रवारपासून ही कसोटी खेळवली जाणार आहे.
स्टोक्सने सोमवारी सांगितले ( Captain Ben Stokes Statement ) की, मी हे बोलत असताना माझ्यावर विश्वास ठेवा. हा वेगळा विरोधक असला तरी आम्ही या (आक्रमक) मानसिकतेसह जाऊ. तो म्हणाला, अर्थातच तो पूर्णपणे वेगळा असेल… वेगळा विरोधक, त्यांचे आक्रमण आणि खेळाडूही वेगळे.
त्याचबरोबर स्टोक्स पुढे म्हणाला, या शेवटच्या तीन सामन्यांमध्ये आम्ही काय चांगली कामगिरी केली. यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत आणि शुक्रवारी भारताविरुद्ध ते सुरू ठेवण्याचा प्रयत्न करू. भारत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर ( India leads the series 2-1 ) आहे. परंतु इंग्लंडच्या एका नव्या संघाचा सामना करेल, ज्यात गेल्या वर्षी भारताविरुद्ध चौथी कसोटी खेळलेल्या संघातील फक्त चार सदस्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो आणि जेम्स अँडरसन या खेळाडूंचा समावेश आहे.