साउथम्पटन (इंग्लंड) -विराट कोहलीच्या नेतृत्वात आज टीम इंडिया आजपासून न्युझिलंडविरोधात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) अंतिम सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय टीमला सामन्याआधी प्रॅक्टिस करायची संधी मिळाली नाही. त्यामुळे मॅच कशी होईल, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारतीय संघ अंतिम सामन्यात तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसह मैदानात उतरणार आहे. संघाचे नेतृत्व विराट कोहली करेल. तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे.
भारतीय संघाच्या सलामीची धुरा युवा शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांच्या खांद्यावर आहे.
रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन अष्टपैलू भूमिका निभावतील. याशिवाय जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज न्यूझीलंडच्या फलंदाजांना वेसण घालण्याचा प्रयत्न करतील.