लंडन - इंग्लडमधील भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील दोन खेळाडूचा अहवाल कोरोना पॉझिटि्व्ह आल्याची माहिती आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघाची टीम इंग्लडविरोधात टेस्ट सीरीज सुरू होणार होती. कोरोनाबाधित आढळलेल्या खेळाडुंना क्वारंटाईन केले आहे. खेळाडू असिम्प्टोमॅटिक आढळले आहेत.
खेळाडुंची कोरोना चाचणी पुन्हा 18 जुलैला करण्यात येणार आहे. कारण आयसोलेशनमध्ये त्यांना 10 दिवस पूर्ण होतील. ही माहिती बीसीसीआय सचिव जय शाह यांनी युकेमध्ये भारतीय संघाला पाठवलेल्या ईमेलमधून समोर आली आहे. यात त्यांना कोरोनासंदर्भात खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.