मुंबई -टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने याची पुष्टी केली. एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये फिरकीपटू वरुण अपयशी ठरला. वरुणला यो-यो चाचणी द्यावी लागली. यात तो आवश्यक असलेला १७.१ गुणांचा आकडा पार करू शकला नाही.
बीसीसीआयने ३५ खेळाडूंना फिटनेस टेस्टसाठी एनसीएकडे पाठवले होते. अहवालानुसार इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात सहभागी असलेला दुसरा खेळाडूही फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला आहे.