अहमदाबाद -इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्यात भारतीय ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने महत्त्वाची भूमिका बजावली. ही मालिका भारताने ३-१ने जिंकली. या विजयानंतर अश्विनची पत्नी प्रीती अश्विनने ट्विटरवरून आपल्या पतीसाठी खास ट्विट केले आहे. मालिकावीराचा मान पटकावलेल्या अश्विनने लवकरात लवकर घरी यावे, असे प्रीतीने म्हटले आहे.
प्रीतीने कॅप्शनमध्ये लिहिले, ''आता बायो बबल तोड आणि घरी ये.'' शेवटच्या कसोटीत पाहुण्या संघाच्या दुसर्या डावात अश्विनने दोन बळी घेतले. भारताने हा सामना एक डाव आणि २५ धावांनी सामना जिंकला. अश्विनने सामन्यात ८ गडी बाद केले. अश्विनने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात ५ बळी घेतले.