महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

एकाच षटकात ५ षटकार ठोकणारा खेळाडू फिटनेस टेस्टमध्ये 'फेल'! - राहुल तेवतिया क्रिकेटपटू न्यूज

एका वृत्तानुसार, राहुल तेवतिया आणि वरुण चक्रवर्ती यांना चाचणीचे निकष पूर्ण करता आले नाहीत. ही चाचणी उत्तीर्ण करण्यासाठी राष्ट्रीय संघाच्या खेळाडूला यो-यो टेस्टमध्ये १७.१ गुण मिळवणे किंवा ८.३मिनिटांत दोन-किलोमीटरची धाव पूर्ण करणे आवश्यक आहे.

Rahul Tewatia latest news
Rahul Tewatia latest news

By

Published : Mar 3, 2021, 4:40 PM IST

मुंबई -अष्टपैलू क्रिकेटपटू राहुल तेवतिया इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेपूर्वी झालेल्या तंदुरुस्तीच्या चाचणीमध्ये अपयशी ठरला आहे. राहुल तेवतियाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, तो तंदुरुस्तीच्या चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊ शकला नाही.

एका वृत्तानुसार, राहुल तेवतिया आणि वरुण चक्रवर्ती यांना चाचणीचे निकष पूर्ण करता आले नाहीत. ही चाचणी उत्तीर्ण करण्यासाठी राष्ट्रीय संघाच्या खेळाडूला यो-यो टेस्टमध्ये १७.१ गुण मिळवणे किंवा ८.३ मिनिटांत दोन-किलोमीटरची धाव पूर्ण करणे आवश्यक आहे. पहिल्या चाचणीमधये राहुल तेवतिया आणि वरुण चक्रवर्ती अपयशी ठरले असतील पण त्यांना तंदुरुस्ती सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळेल.

राहुल तेवतियाची आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी

गेल्या आयपीएल हंगामात राहुल तेवतियाने शानदार प्रदर्शन केले. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात शेल्डन कॉट्रेलच्या एकाच षटकात ५ षटकार मारत सर्वांना चकित केले. त्यानंतर त्याने अनेक उत्तम खेळी केल्या. यामुळेच त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले.

इंग्लंड विरुद्ध टी -२० मालिकेसाठी भारतीय संघ -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक) युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.

हेही वाचा - आयसीसीच्या महिन्यातील सर्वोत्तम पुरस्कारासाठी अश्विनला नामांकन

ABOUT THE AUTHOR

...view details