चेन्नई - भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतात आपला पहिला कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात बुमराहने डॅनियल लॉरेन्सला बाद शून्यावर बाद केले. याआधी बुमराहने भारताबाहेर १७ कसोटी सामने खेळले आहेत. पण, लॉरेन्स हा बुमराचा भारतातीतल पहिलाच कसोटी बळी ठरला. भारत आणि इंग्लंड यांच्यात एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आजपासून पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे.
जसप्रीत बुमराहचा हा १८ वा कसोटी सामना आहे. मात्र, यापूर्वीचे १७ सामने त्याने भारताबाहेर खेळले असल्याने त्याचा हा भारतातील पहिलाच कसोटी सामना आहे. त्यामुळे विदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळून मायदेशात पहिला सामना खेळण्याचा विक्रमात त्याने जवागल श्रीनाथला मागे टाकले. माजी जलदगती गोलंदाज श्रीनाथने पदार्पणापासून विदेशात १२ कसोटी सामने खेळले आहेत. त्यानंतर त्याला भारतात खेळण्याची संधी मिळाली. या क्रमवारीत रुद्र प्रताप सिंग (११), सचिन तेंडुलकर (१०) आणि आशिष नेहरा (१०) यांचा समावेश आहे.