चेन्नई -चेपॉक स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वाधिक नो बॉल टाकले आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात ८ बाद ५५५ धावांपर्यंत मजल मारली. या डावात भारताच्या गोलंदाजांनी १९ नो बॉल टाकले. तब्बल १० वर्षानंतर भारताने एका कसोटीच्या डावात इतके नो बॉल टाकले आहेत.
हेही वाचा - राजस्थान करणार विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इतर कोणत्याही संघाच्या गोलंदाजांनी टाकलेले हे सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे नो बॉल ठरले आहेत. २०१० मध्ये कोलंबो येथे झालेल्या तिसर्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी १६ नो बॉल टाकले होते. तर, या विक्रमात श्रीलंकेचाच प्रथम क्रमांक आहे. २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्याच्या डावात लंकेने सर्वाधिक २१ नो बॉल टाकले होते.
पहिल्या कसोटी सामन्यात पाहुणा संघ वरचढ झाला आहे. कर्णधार जो रूटच्या द्विशकामुळे इंग्लंडला पाचशे धावांच्या वर जाता आले. भारतीय गोलंदाजांनी १८० षटके गोलंदाजी केली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीम यांनी ६, ईशांत शर्माने ५ तर, अनुभवी ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने २ नो बॉल टाकले आहेत.
इशांत शर्मा २०१०मध्ये कोलंबोमध्ये झालेल्या कसोटी संघाचा सदस्य होता, ज्यत भारतीय गोलंदाजांनी १६ नो बॉल फेकले होते. यावेळी इशांतने दोन्ही डावात प्रत्येकी ४ नो बॉल टाकले होते.