मुंबई- इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. इशान किशनला अतिरिक्त यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.
12 मार्च रोजी अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमवर पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. जादुई फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा संघात समावेश करण्यात आला आहे. मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू राहुल तेवतिया यांनाही संघात स्थान मिळाले आहे.