अहमदाबाद -नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी इंग्लंडला भारताने एक डाव आणि २५ धावांनी पराभूत करून मालिका ३-१ अशी जिंकली. हा भारताचा घरच्या मैदानावरील सलग १३वा कसोटी मालिकाविजय होता.
२०१३मधील कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर ४-० असे हरवले होते. त्यापासून भारताने पाकिस्तानला सोडून घरच्या मैदानात आठ संघांना हरवले आहे. २०१३पासून भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला दोन वेळा घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. तर, २०१२-१३मध्ये इंग्लंडने भारताला भारतात २-१ असे हरवले होते.