होवे (इंग्लंड) -भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडवर मात केली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत चार गडी गमावत 148 धावांपर्यंत मजल गाठली होती. भारताकडून शफाली वर्मा हिने 38 चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक 48 धावा फटकावल्या. कर्णधार हरमनप्रित कौर हिने 25 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारसह 31, स्मृती मनधाना हिने 16 चेंडूंत एक चौकार आणि एका षटकारसह 20, रिचा घोष हिने 9 चेंडूंत एका षटकारसह 8 धावा केल्या. दिप्ती शर्माने 27 चेंडूंत 24 धावा करत नाबाद राहिली. तर स्नेहा राणा ही देखील 5 चेंडूंत एक चौकारह 8 धावांवर नाबाद राहिली. भारताने 20 षटकांत इंग्लंड संघाला 149 धावांचे आव्हान दिले होते. या बदल्यात इंग्लंडचा संघ 140 धावापर्यंतच मजल मारु शकला.