नवी दिल्ली -गुजरात क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) सरदार पटेल स्टेडियमवर (मोटेरा) होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी तिकिटांची विक्री सुरू केली आहे. उभय संघातील तिसरा आणि चौथा कसोटी सामना मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. यापैकी तिसऱ्या सामन्याची विक्री काल रविवारी ११ वाजल्यापासून सुरू झाली आहे.
जगातील सर्वात मोठे स्टेडियम अशी ओळख बनलेल्या मोटेराची प्रेक्षकसंख्या १ लाख २० हजार इतकी आहे. या सामन्यासाठी प्रशासनाने ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची मान्यता दिली आहे. या मैदानावर उभय संघ दोन कसोटी आणि पाच टी-२० सामने खेळणार आहेत. यामध्ये तिसरा कसोटी २४ फेब्रुवारीपासून गुलाबी चेंडूने खेळला जाईल.