अहमदाबाद -सुरुवातीला झालेल्या पडझडीनंतर यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने भारताला दुसऱ्या दिवशी सांभाळले. दुसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडसमोर पहिल्या डावात ७ बाद २९४ धावा केल्या. भारताकडे आता ८९ धावांची आघाडी आहे. रिषभ पंतने आक्रमक खेळीचा नजराणा पेश करत कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक साकारले. तर, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद अर्धशतकी खेळी करत त्याला उत्तम साथ दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उभय संघात कसोटी मालिकेचा शेवटचा आणि चौथा सामना सुरू आहे. मालिकेत भारत २-१ने आघाडीवर आहे
कालच्या १ बाद २४ या धावसंख्येवरून आज भारताने पुढे खेळायला सुरुवात केली. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा संघाला मोठी धावसंख्या उभारून देतील असे वाटत होते. मात्र, इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचने पुजाराला १७ धावांवर पायचित पकडले. त्यानंतर आलेला विराट कोहली भोपळाही न फोडता तंबूत परतला. बेन स्टोक्सने त्याला झेलबाद केले. त्यानंतर रोहित आणि अजिंक्य रहाणे यांनी सावध पद्धतीने खेळायला सुरुवात केली. अजिंक्यचा जम बसलेला असताना वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने त्याला माघारी धाडले. अजिंक्यने ४ चौकारांसह २७ धावा केल्या. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या रोहितला स्टोक्सने पायचित पकडले. रोहिड ४९ धावांवर बाद झाला. त्यानंतर अश्विनही १२ धावांवर माघारी परतला.
पंत-सुंदरची जोडी जमली -