नवी दिल्ली -भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याद्वारे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध कोण खेळणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, हा कसोटी सामना भारतीय सलामीवीर रोहित शर्मासाठी खूप खास ठरला. पहिल्या डावातील ४९ धावांच्या जोरावर रोहितने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या रोहितने १४४ चेंडूत ४९ धावा केल्या. सलामीवीर म्हणून त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १००० धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितव्यतिरिक्त कोणत्याही सलामीवीराला या स्पर्धेत आतापर्यंत इतक्या धावा करता आलेल्या नाहीत.