नवी दिल्ली - भारत दौऱ्यावर असलेला इंग्लंडचा संघ कसोटी मालिकेत भारताला हरवू शकतो, असे मत माजी भारतीय फिरकीपटू दिलीप दोशी यांनी दिले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून चेन्नईत पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
हेही वाचा - इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी सामन्यापूर्वी का बांधली काळी पट्टी?
एका संभाषणात दिलीप दोशी यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी भारतीय संघाला दावेदार मानले परंतु इंग्लंडच्या आश्चर्यकारक क्षमतेवर विश्वास ठेवला. इंग्लंडने श्रीलंकेच्या त्यांच्यात भूमीत मात दिल्यामुळे दोशी यांनी इंग्लंडच्या पारड्यात आपले मत दिले आहे. पाहुणा संघ संतुलित असल्याचेही ते म्हणाले.
पहिल्या सत्रात बर्न्स आणि लॉरेन्स यांच्या विकेट्स लागोपाठ गमावल्यानंतर जो रूट आणि सिब्लेने इंग्लंडला सांभाळले आहे. इंग्लंडने दुसरे सत्र संपले तेव्हा पहिल्या डावात ५७ षटकांत २ बाद १४० धावा केल्या. रूट १०० चेंडूत ४५ धावांवर नाबाद खेळत आहे. तर सिब्ली १८६ चेंडूत ५३ धावांवर नाबाद खेळत आहे.