महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारत वि. इंग्लंड : दुसऱ्या कसोटीसाठी पाहुण्यांचा संघ जाहीर, ब्रॉड परतला

बेन फॉक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि ओली स्टोन यांना १२ सदस्यीय कसोटी संघात जागा मिळाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आज संघाची घोषणा केली.

स्टुअर्ट ब्रॉड
स्टुअर्ट ब्रॉड

By

Published : Feb 12, 2021, 3:20 PM IST

चेन्नई - चेपॉक स्टेडियमवर उद्यापासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने संघात चार बदल केले आहेत. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सामन्यातून बाहेर पडला असून जोस बटलरलाही संघाबाहेर बसवण्यात आले आहे. आश्चर्य म्हणजे, पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी केलेले वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ऑफस्पिनर डॉम बेस यांनाही दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे.

हेही वाचा - इंग्लंडला जबर धक्का..! वेगवान गोलंदाज झाला संघाबाहेर

या चार खेळाडूंच्या जागी बेन फॉक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि ओली स्टोन यांना १२ सदस्यीय कसोटी संघात जागा मिळाली आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आज संघाची घोषणा केली. मात्र, या चार खेळाडूंपैकी अंतिम अकरामध्ये कोणाला संधी मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

रूट म्हणाला की, जॉनी बेअरस्टो दुसर्‍या कसोटीनंतर संघात रुजू झाला तरी फॉक्स सामन्यात यष्टिरक्षण करेल. पहिल्या कसोटी सामन्यात अँडरसन आणि बेसने प्रत्येकी पाच बळी घेतले. पहिल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने २२७ धावांनी भारताला नमवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

१२ सदस्यीय इंग्लंड संघ -

डोम सिब्ले, रोरी बर्न्स, डॅनियल लॉरेन्स, जो रूट (कॅप्टन), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फॉक्स, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, जॅक लीच आणि ओली स्टोन.

ABOUT THE AUTHOR

...view details