लंडन -भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. लॉर्ड्स येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवस अखेर भारताने ६ बाद १८१ धावा करताना १५४ धावांची आघाडी घेतली आहे. खराब विद्युत प्रकाशामुळे चौथ्या दिवसांचा खेळ ८ षटके आधीच थांबवण्यात आला. रिषभ पंत १४ धावांवर खेळत आहे.
उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आपले २४वे कसोटी अर्धशतक ठोकले आहे. भारताने आपल्या दुसऱ्या डावात 6 बाद १५१ धावा केल्या आहेत. तीन गडी तंबूत परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा (४१) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (५८) यांनी 100 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सांभाळला आहे. या जोडीनं २९७ चेंडू म्हणजेच जवळपास ५० षटकं खेळून काढली अन् १०० धावांची भागीदारी केली. लॉर्ड्स कसोटीत सर्वाधिक २९७ चेंडूंचा सामना करण्याचा विक्रमही या जोडीनं नावावर केला.
लोकेश राहुल ( ५), रोहित शर्मा ( २१) व विराट ( २०) माघारी परतल्यानंतर अजिंक्य-पुजारा जोडीनं टीम इंडियाला सावरले. सुरुवातीला संयमी खेळ करून त्यांनी खेळपट्टीवर ठाण मांडला. स्थिरावल्यानंतर जोखमीचे फटके मारण्याचं टाळून गॅपमधून ही जोडी चौकार जमवताना दिसली. अजिंक्यला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी १२५ चेंडूंचा सामना करावा लागला अन् १५ ऑगस्टला कसोटीत अर्धशतक करणारा महेंद्रसिंग धोनीनंतर तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 364 धावा केल्या आहेत तर इंग्लंडने पहिल्या डावात 391 धावा करत भारतावर 27 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारताची सुरुवात खराब राहिली भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतले तर कर्णधार विराट कोहलीही अपयशी ठरला.