लंडन - इंग्लंडचा महिला संघ आणि भारतीय महिला संघ यांच्यात उद्यापासून कसोटी सामन्याला उद्यापासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी मागील काही दिवसांपासून सराव करत आहेत. भारताकडे मिताली राज, स्मृती मानधाना आणि हरमनप्रीत सारखे खेळाडू आहेत. तर दुसरीकडे इंग्लंडकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे.
इंग्लंड संघाने आपला अखेरचा कसोटी सामना २०१९ मध्ये खेळला होता. मागील वर्षात इंग्लंड संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. यामुळे ते भारतीय महिला संघावर वरचढ होण्याचा प्रयत्न करतील. पण भारतीय संघाकडे चांगले फलंदाज आहेत. उभय संघातील या सामन्याला भारतीय वेळेनुसार, ३ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होणार आहे.
इंग्लंड महिला संघ -
एमी जोन्स (यष्टीरक्षक), टॅमी ब्यूमोंट, हिदर नाइट (कर्णधार), नताली सीवर, जॉर्जिया एल्विस, लॉरेन विनफील्ड, कॅथरीन ब्रंट, अन्या श्रुबसोले, सोफी एक्लेस्टोन, केट क्रॉस/एमिली अर्लट आणि मॅडी विलियर्स.