सिडनी : टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अतिशय ( Sri Lanka Won The Toss and Batted First ) महत्त्वाच्या आणि निर्णयाक सामन्यात इंग्लंडच्या संघानं श्रीलंकेचा चार विकेट्सनं (England Beats Sri Lanka) धुव्वा उडवला. या ( T20 2022 World Cup Match Today ) सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 142 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या संघानं दोन चेंडू शिल्लक ठेवून हा सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं सेमीफायनलचं तिकिट पक्क केलं. तर, श्रीलंकेच्या पराभवासह यजमान ऑस्ट्रेलियाचंही या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.
आतापर्यंत श्रीलंकेची स्पर्धेतील कामगिरी :दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाने चारपैकी दोन सामने जिंकले असून, दोनमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या फेरीतील गटात श्रीलंकेने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. गेल्या पाच टी-20 सामन्यांमध्ये इंग्लंडने चार जिंकले आहेत आणि एक गमावला आहे. दुसरीकडे, श्रीलंकेच्या संघाने पाचपैकी तीन टी-२० सामने जिंकले असून, दोनमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. T20 विश्वचषक 2022 च्या 39 व्या सामन्यात आज इंग्लंडचा सामना श्रीलंकेशी होत आहे. दोन्ही संघ गट 1 मध्ये असून, पाच आणि चार गुणांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. सुपर 12 मध्ये इंग्लंडने चार सामने खेळले असून, त्यापैकी दोन जिंकले आहेत. एक पराभव झाला आहे. एक सामना अनिर्णित आहे.