लंडन -भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अनेकवेळा बेजबाबदार फटका मारून बाद झाल्याने टीकेचा धनी ठरला आहे. परंतु भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ऋषभ पंतची पाठराखण केली. तो म्हणाला की, त्याला त्याच्या नैसर्गिक शैलीत फलंदाजी करण्याची मोकळीक आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पावसामुळे ड्रॉ झाला. परंतु भारताला या सामन्यात विजयाची संधी होती. भारतीय संघ विजयापासून फक्त 157 धावा दूर होता. तर भारताचे 9 गडी शिल्लक होते. परंतु पावसामुळे पाचव्या दिवसाचे खेळ होऊ शकला नाही. पण या सामन्यातील पहिल्या डावात ऋषभ पंतने आक्रमक खेळी केली होती. पण त्याला या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आले नाही
पंतविषयी कर्णधार विराट कोहली म्हणाला, त्याची ही नैसर्गिक शैली आहे. तो अशाच पद्धतीने फलंदाजी करतो. परिस्थिती ओळखून फलंदाजी करण्यात तो माहीर आहे. प्रत्येक वेळी त्याला संयमी खेळी करण्याची गरज नाही. सामन्याच्या कोणत्याही क्षणी तो खेळ पालटू शकतो. जर एखादा सामना वाचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तेव्हा तो असे बेजबाबदार फटके खेळत नाही. जेव्हा 50-50 टक्के संधी असते. तेव्हा तो चान्स घेतो. तो तसाच प्रकारे फलंदाजी करतो. आम्ही देखील त्याच्याकडून अशाच फलंदाजीची अपेक्षा करतो.