लंडन -भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा निर्णायक कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला. उभय संघातील या सामन्याला 10 सप्टेंबरपासून सुरूवात होणार होती. पण सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाचे ज्यूनियर फिजिओ योगेश परमार कोरोना बाधित आढळले. यामुळे शुक्रवारी नाणेफेकच्या आधी भारतीय संघाने मैदानात उतरण्यास नकार दिला. यामुळे पाचवा सामना रद्द करण्यात आला. या विषयावरून इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन याने गंभीर आरोप केला आहे.
पैसा आणि आयपीएलमुळे सामना रद्द
मायकल वॉन याने 'द टेलिग्राफ'साठी कॉलम लिहला आहे. यात ते म्हणतात की, प्रामानिकपणे सांगायचे तर पैसा आणि आयपीएलमुळे सामना रद्द करण्यात आला. कारण खेळाडूंना कोरोना संक्रमणाचा धोका आणि आयपीएल मिस करण्याची भिती वाटत असेल. एका आठवड्यात आपण आयपीएल पाहू. यात खेळाडू हसत खेळत भाग घेताना दिसतील. पण त्यांना आरटीपीसीआर चाचणीवर विश्वास हवायला हवा होता. आता आपण या व्हायरस संदर्भात खूप काही जाणतो. याची काळजी आपण अधिक चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो.
भारताने खेळाडूंना मैदानात उतरवण्याचा प्रयत्न करायला हवा होता
भारत 20 सदस्यांपैकी 11 खेळाडूंचा संघ मैदानात उतरू शकला नाही. याचे मला आश्चर्य वाटतं. जे खेळाडू सामन्यात खेळू इच्छित नव्हते, त्यांनी यातून वेगळं व्हायला हवे होते. हे ठीक होतं. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पण भारताने 11 खेळाडूंना मैदानात उतरवण्यासाठी शक्य तो प्रयत्न करायला हवा होता. भलेही त्यांना राखीव खेळाडूंसह का होईना मैदानात उतरावे लागले असते. त्यांनी ऑस्ट्रेलियात खूप साऱ्या राखीव खेळाडूंसह विजय मिळवला होता, असे देखील मायकल वॉन याने म्हटलं आहे.