लंडन -भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. पण या मालिकेला सुरूवात होण्याआधीच यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज ओली पोपला दुखापत झाली आहे. यामुळे तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे.
२३ वर्षीय ओली पोप सरे क्लबकडून स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत होता. तेव्हा पोपच्या मांडीचे स्नायू दुखावले गेले आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने याची माहिती दिली.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सांगितलं की, ओली पोप यांच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले गेले आहे. यामुळे तो भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मैदानात सराव करू शकत नाही.
ईसीबी आणि सरे क्लबच्या डॉक्टरांच्या निघरानी खाली ओली पोपवर उपचार सुरू आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेआधी पोप फिट झाला पहिजे, यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत.