बर्मिंगहॅम:इंग्लंड आणि भारत यांच्यात शुक्रवारपासून पाचवा कसोटी सामना ( ENG vs IND 5th Test ) खेळवला जाणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार जसप्रीत बुमराह आणि बेन स्टोक्स यांच्यात नाणेफेक पार पडली. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( England opt to bowl ) आहे. भारतीय संघ मालिकेत 2-1 ने पुढे आहे. हा शेवटचा सामना जिंकून किंवा अनिर्णित राहून मालिका जिंकण्याचा त्यांचा सर्वोत्तम प्रयत्न असेल.
शेवटच्या दौऱ्यात हा सामना पुढे ढकलण्यात आला होता, जो नंतर 1 ते 5 जुलै दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघ वेगवान गोलंदाजी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली उतरेल. जसप्रीत माजी खेळाडू कपिल देव यांच्यानंतर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणारा दुसरा वेगवान गोलंदाज आहे.