बर्मिंगहॅम : येथील एजबॅस्टन क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड संघात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना खेळला जात ( ENG vs IND 5th Test ) आहे. या सामन्यात बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी जसप्रीत बुमराहच्या भारतीय संघाला आमंत्रित केले आहे. त्यानंसार भारतीय सघाने प्रथम फलंदाजी करताना पूर्णपणे निराशा केली आहे. कारण भारतीय संघाची धावसंख्या 24.5 षटकांत 4 बाद 77 धावा अशी झाली आहे.
भारतीय संघाच्या डावाची सुरुवात युवा फलंदाज शुबमन गिल आणि अनुभवी फलंदाजा चेतेश्वर पुजारा ( Veteran batsman Cheteshwar Pujara ) यांनी केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 6.2 षटकांत 27 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शुबमन गिल वैयक्तिक 17 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर भारतीय संघाला दुसरा झटका चेतेश्वर पुजाराच्या रुपाने बसला. तो 13 धावा काढून बाद झाला. दोघांचे झेल क्रॉवलीने एंडरसनच्या गोलंदाजीवर घेतले.