ओवल -इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 466 धावांवर आटोपला. यानंतर इंग्लंडला विजयासाठी 368 धावांचे आव्हान मिळाले आहे. दरम्यान, भारतीय संघाने या सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना ओवलच्या मैदानात रंगला आहे. भारतीय संघाने नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 191 धावा केल्या. यानंतर इंग्लंड संघाने 290 धावा करत पहिल्या डावात 99 धावांची आघाडी मिळवली. तेव्हा भारतीय संघ दबावात आला. पण दुसऱ्या डावात भारतीय संघाने दमदार फलंदाजीचे दर्शन घडवले.
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी बहरली
भारतीय संघाने दुसऱ्या डावात 466 धावा करत इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवले. रोहित शर्माने 14 चौकार आणि 1 षटकारासह झंझावती 127 धावांची खेळी केली. यानंतर चेतेश्वर पुजारा (61), शार्दुल ठाकूर (60), ऋषभ पंत (50), के एल राहुल (46), विराट कोहली (44), उमेश यादव (25) आणि जसप्रीत बुमराह याने 24 धावांचे योगदान दिले.
शार्दुल ठाकूर-ऋषभ पंतची भागिदारी