महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ENG vs IND 1st ODI : नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय; पहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत आणि इंग्लंड ( ENG vs IND ) संघातील पहिल्या वनडे सामन्याला साडेपाचपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( India opt to bowl ) घेतला आहे.

ENG vs IND
ENG vs IND

By

Published : Jul 12, 2022, 5:30 PM IST

लंडन : भारत आणि इंग्लंड संघात आजपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना ( ENG vs IND 1st ODI ) केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर सायंकाळी साडेपाचला सुरु होणार आहे. या अगोदर दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ( Captain Rohit Sharma ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( India opt to bowl ) आहे.

तीन सामन्याच्या मालिकेतील हा पहिला सामना जिंकून आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील. त्याचबरोबर इंग्लंडचा संघ टी-20 मालिकेचा बदला वनडे मालिकेत घेण्याच्या निर्धाराने मैदानात प्रवेश करेल. भारतीय संघाने स्टार फलंदाज विराट कोहलीला विश्रांती ( Rest to Virat Kohli ) देण्यात आली आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन):रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, ब्रायडन कार्स आणि रीस टॉप्ले

हेही वाचा -Sunil Gavaskar Statement : ज्येष्ठ खेळाडू आयपीएल खेळू शकतात तर देशासाठी का नाही सुनील गावस्करांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details