महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ICC Test Rankings: रविंद्र जडेजा कसोटीत अव्वल - आयसीसी अष्टपैलू खेळाडू क्रमवारी न्यूज

आयसीसीने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात जडेजा ३८६ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकलं. होल्डरच्या नावे ३८४ गुण आहेत. बेन स्टोक्स (३७७) व आर अश्विन (३५३) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

during-wtc-final-ravindra-jadeja-becomes-the-new-no-1-icc-test-all-rounder
during-wtc-final-ravindra-jadeja-becomes-the-new-no-1-icc-test-all-rounder

By

Published : Jun 23, 2021, 4:51 PM IST

दुबई - भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे. आज या सामन्याचा अखेरचा दिवस आहे. यादरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. त्याने आयसीसी कसोटीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. ४ वर्षानंतर पुन्हा जडेजा अव्वलस्थानी पोहोचला आहे.

आयसीसीने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात जडेजा ३८६ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकलं. होल्डरच्या नावे ३८४ गुण आहेत. बेन स्टोक्स (३७७) व आर अश्विन (३५३) अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.

क्विंटन डी कॉकची टॉप १० मध्ये एन्ट्री

फलंदाजांच्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक याने टॉप १० मध्ये प्रवेश केला आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद १४१ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या कसोटीत त्याने ९६ धावांची खेळी केली. त्याला याचा फायदा क्रमवारीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमची क्रमवारीत घसरण झाली आहे. तो ११व्या स्थानावर ढकलला गेला आहे. त्याची जागा डी कॉकने घेतली.

हेही वाचा -WTC Final : भारताकडे ३२ धावांची आघाडी, बुधवारी ठरणार जागतीक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता

हेही वाचा -WTC Final : न्यूझीलंड खेळाडूला शिवीगाळ, प्रेक्षकांवर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details