लाहोर- रमीज राजा यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष करण्यात येऊ नये, अशी मागणी पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज सर्फराज नवाज यांनी केली आहे. रमीज राजा भारताच्या समर्थनात आणि पाकिस्तानच्या विरोधात बोलतात, असे नवाज यांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानचे माध्यम डॉनच्या रिपोर्ट नुसार, सर्फराज नवाज यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहलं आहे. यात त्यांनी पीसीबीचे चेअरमन जहीर अब्बास किंवा माजिद खान यांना पीसीसीचे अध्यक्ष करण्याचा सल्ला दिला आहे.
सर्फराज नवाज यांनी त्यांच्या पत्रात लिहलं आहे की, माध्यमात बातमी आहे की, तुमच्या संमतीने पीसीबीच्या अध्यक्ष पदासाठी एहसान मनीच्या जागेवर रमीज राजा यांना नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीसीबीचे कर्तेधर्ते म्हणून तुम्हाला हा अधिकार आहे. यात कोणतीही शंका नाही. तुम्ही कोणालाही पीसीबीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकता.