त्रिनिदाद: यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने ( Wicketkeeper-batsman Dinesh Karthik ) संथ विकेटवर फक्त 19 चेंडूत 213 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 41 धावा करत धावसंख्या सोपी केली. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 20 षटकात 6 गडी गमावून 190 धावा केल्या आहेत. यानंतर भारताने यजमानांचा 68 धावांनी ( India won by 68 runs ) पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयानंतर यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने प्रतिक्रिया ( Dinesh Karthik Statement ) दिली.
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकादरम्यान ( ICC T20 World Cup ) भारताच्या मोहिमेत भूमिका बजावण्यास तो उत्सुक असल्याचेही कार्तिकने सांगितले. तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही मधल्या फळीतील संघासाठी खेळता. तेव्हा परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि चेंडूचे मूल्यांकन, तुम्ही कोणत्या प्रकारचे शॉट्स खेळू शकता या संदर्भात तुम्हाला तुमच्या पायाकडे खूप लक्ष द्यावे लागते.