मुंबई - देशात १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे क्रिकेटपटू देखील लस टोचून घेताना दिसून येत आहेत. काही तासांपूर्वी दिनेश कार्तिकने देखील लसीचा पहिला डोस घेतला आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली होती. या फोटोजवरून ख्रिस लीनने त्याला ट्रोल केले आहे.
दिनेश कार्तिकने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून लस टोचून घेतानाचा फोटो शेअर करत म्हटलं की, मी लस टोचून घेतली आहे. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज ख्रिस लीनने या फोटोवरून दिनेश कार्तिकला ट्रोल केलं आहे. त्याने, कमीत कमी पँट तरी घालायची, या शब्दात कार्तिकला ट्रोल केलं आहे.
कार्तिकने जॉगर पँट घातली होती. लीनच्या ट्विटला कार्तिकने देखील उत्तर दिलं आहे. तो म्हणाला की, 'मी देखील तुझ्यासारखी शॉर्ट्स घालण्याचा विचार करत होतो. परंतु नंतर मला आठवले की, मी मालदीवमध्ये नाहीये. त्यामुळे मी हे घातलं.'
दरम्यान, कार्तिक आणि लीन हे दोघेही कोलकाता नाईट रायडर्स संघामध्ये एकत्र खेळले आहेत. त्यामुळे ते अनेकदा मस्ती करताना दिसून आले आहेत.