चेन्नई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( Former captain Mahendra Singh Dhoni ) 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या समारोप समारंभाचे खास आकर्षण ( 44th Chess Olympiad Closing Ceremony ) असेल. ममल्लापुरम येथे खेळल्या जाणार्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा समारोप मंगळवारी म्हणजेच आज 11व्या आणि अंतिम फेरीने होईल. बुद्धिबळ ऑलिम्पियाड भारतात प्रथमच आयोजित करण्यात आले. ज्यामध्ये खुल्या आणि महिला गटात विक्रमी संघांनी सहभाग घेतला. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन 9 ( Tamil Nadu Chief Minister MK Stalin ) असतील.
44th Chess Olympiad Closing Ceremony : बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या समारोप समारंभाचे मुख्य आकर्षण असणार धोनी - भारतीय क्रिकेट टीम के पूर्व कप्तान महेंद्र सिंह धोनी
चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये 28 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे ( 44th Chess Olympiad ) उद्घाटन केले होते. या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचा समारोप आज पार पडणार आहे. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज हजर राहणार आहेत.
जागतिक बुद्धिबळाची सर्वोच्च संस्था FIDE चे अध्यक्ष अर्काडी ड्वोरकोविच ( FIDE President Arkady Dvorkovich ) आणि अलीकडेच निवडून आलेले उपाध्यक्ष आणि माजी विश्वविजेते विश्वनाथन आनंद या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जुलै रोजी नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये ऑलिम्पियाडचे उद्घाटन केले होते.
हेही वाचा -Cwg 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने रचला इतिहास; 200 सुवर्णपदके जिंकणारा ठरला चौथा देश